दिव्यांग कल्याण आयुक्त-महेश पाटील, पुणे यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली…
दिव्यांग कल्याण आयुक्त
चंद्रसागर बहूउद्देशीय सेवाभावी संस्था व संस्थेद्वारे संचालित राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालय ,औराद शहा ,तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील मुख्याध्यापक हे वरिष्ठ कार्यालयाच्या प्रशासकीय निर्देशाचा अवमान करून संस्थेतील कर्मचारी बबन नामदेव भंडारे,शिरीष सुरेंद्र जाधव आणि अर्चना श्रीरंग पाटील या कर्मचाऱ्यांचे हक्काचे नियमित वेतन व इतर सेवानुषंगाने लाभ सूडभावनेतून रोखून धरीत आहेत त्यामुळे हे कर्मचारी दि १५-१२-२०२५ पासून उपोषणास बसले होते परंतु पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्यामुळे आणि दि १५-१२-२०२५ पासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासन प्रशासन यांवर अधिक भर पडू नये म्हणून उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते परंतु दिव्यांग कल्याण आयुक्त महेश पाटील यांनी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मधील कलाम ८९ अन्वये चंद्रसागर बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध व मुख्याध्यापक यांचे विरुद्ध स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करणेबाबत कार्यवाही करावी अश्या आशयाचा निर्देश दिव्यांग सक्षमीकरण विभाग,जिल्हा परिषद लातूर याना दिला होता आणि अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तालय ,पुणे येथे सादर करावा असा निर्देश देण्यात आला होता परंतु अजून पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नसल्याने प्रकरण दाबले गेले किंवा कसे असा संशय कर्मचाऱ्यांमध्ये आहे.पुढील कार्यवाही दिव्यांग सक्षमीकरण विभाग ,जिल्हा परिषद लातूर यांचेकडून संतोषकुमार नाईकवाडी हे करीत असून लवकरच न्याय मिळणे अपेक्षित आहे .




