महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेतील काँग्रेस गटाची पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे नोंदणी

गटनेतेपदी चेतन नरोटे

पुणे : दिनांक, ३० जानेवारी २०२६

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेस पक्षाकडून दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली असून, या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र गट स्थापन करण्यास एकमताने मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, प्रभाग क्रमांक १५-ड मधून निवडून आलेले नगरसेवक चेतन पंडित नरोटे यांची काँग्रेस गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी आज पुणे येथे मा. विभागीय आयुक्त, पुणे श्री. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे व नरसिंह आसादे उपस्थित होते.


सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचा अधिकृत गट स्थापन झाल्याने आगामी काळात महापालिकेच्या सभागृहात तसेच शहराच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक ठामपणे आणि प्रभावीपणे मांडली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, शिवशंकर अंजनाळकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!