५३ वे राज्यस्तरीय शिक्षकेतर अधिवेशन हे दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदान, टिळक नगर, मुंबई येथे
प्रा. देविदास पंडागळे (अध्यक्ष, बृहन्मुंबई तथा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजन समिती ) यांचे कळकळीचे आवाहन

मुंबई, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांच्या वतीने आयोजित ५३ वे राज्यस्तरीय शिक्षकेतर अधिवेशन हे दि. १ फेब्रुवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदान, टिळक नगर, मुंबई येथे संपन्न होत आहे.
या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, सेवा-सुरक्षा, वेतनवाढ, पदोन्नती, शिक्षकेतर पद भरती, जुनी पेन्शन योजना यांसह विविध महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कळकळीचे आवाहन प्रा. देविदास पंडागळे (अध्यक्ष, बृहन्मुंबई तथा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजन समिती ), श्री. सूनिल खाडे (सह कार्यवाह, मुंबई) व श्रीमती प्रिया पवार (उपाध्यक्ष) यांनी केले आहे.
मुंबई विभागाने नेहमीच संघटनेच्या चळवळीत अग्रणी भूमिका बजावली असून, यावेळीही विक्रमी उपस्थिती नोंदवून संघटनेची ताकद शासनदरबारी दाखवून देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हे अधिवेशन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.




