तंबाखू खाऊन थुंकल्याच्या किरकोळ कारणावरून ऋतुरंग सोसायटीच्या अध्यक्षांनी सुरक्षा कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले
कोथरूड ऋतुरंग हाऊसिंग सोसायटीतील संतापजनक घटना

कोथरूड येथील ऋतुरंग हाउसिंग सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले दशरथ दगडू मानकर – राहणार जयभवानी नगर,कोथरूड ,पुणे यांनी तंबाखू खाऊन ती थुंकली या कारणामुळे ऋतुरंग हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अभ्यंकर यांनी कोणतीही शहानिशा न करता त्यांना शिवीगाळ करून अपमानित करून सोसायटीच्या बाहेर हाकलून दिले. सदर प्रकार घडत असताना श्री मानकर यांनी झालेल्या चुकीबद्दल जाहीरपणे माफी मागितली व साफसफाई केली परंतु त्यांच्यावर गाडीवर लघवी केल्याचा खोटा आरोप करून त्यांना सोसायटीतून हाकलून देण्यात आले. सदर प्रकरणे त्यांनी लघवी केल्याचा कोणताही पुरावा नसताना त्याची शहानिशा न करता अभ्यंकर यांनी खोट नाट् आरोप करून त्यांना अपमानित केले आहे. मानकर हे ट्रॅक्ऑन सिक्युरिटी सर्विस नामक फर्म मध्ये कार्यरत असून अंकुश राजगिरे ही फर्म चालवितात. ट्रॅक ऑन सिक्युरिटी सर्विसेस या फर्म बद्दल अनेक तक्रारी येत आहेत. ज्यामध्ये सुरक्षा रक्षकांना प्रत्येकी महिन्याच्या 20 तारखेपर्यंत पगारासाठी रखडावणे, पगार न देणे पगार घेऊन गिळंकृत करणे, नोकर नाम्याची नोंद न ठेवणे ,कामगारांसाठीच्या सोयीसुविधा त्यांना दिल्या जात नाहीत. नवीन कामगार नियमाप्रमाणे कामगाराला अचानक काढून टाकल्यानंतर त्याचा 15 दिवसाचा पगार देणे बंधनकारक आहे आणि त्याची सेटलमेंट 45 दिवसांमध्ये होणे अनिवार्य आहे .

आता दशरथ मानकर यांचा जानेवारी 2026 महिन्याचा पूर्ण पगार तसेच फेब्रुवारी 2026 महिन्याचे 14 दिवस तसेच अचानक कामावरून काढून टाकल्या प्रकरणी 15 दिवसाचा पगार मिळणे अपेक्षित असून पगार न दिल्यास कामगार उपायुक्त शिवाजीनगर यांचे कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने दाद मागितली जाईल.