महाराष्ट्र

ससून रुग्णालय बाहेरील नो पार्किंग झोनमधील खाजगी ॲम्बुलन्स ससून च्या आवारामध्ये स्थलांतरित करण्याची किंवा त्यांचे वर कारवाई करण्याची क्रांती मजदूर सेनेची पोलीस उपायुक्त हिम्मतराव जाधव वाहतूक विभाग यांचे कडे मागणी.

ससून रुग्णालय बाहेरील नो पार्किंग झोनमधील खाजगी ॲम्बुलन्स

ससून रुग्णालयाच्या बाहेर गेटच्या बाजूला covid कार्यकाळानंतर अंदाजे 30 ते 40 खाजगी ॲम्बुलन्स नो पार्किंग झोन मध्ये पार्किंग केलेल्या असतात .त्याचा त्रास बाहेरून येणारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना होत आहे पूर्वी या ठिकाणी ऑटो रिक्षा स्टॅन्ड होते परंतु जेव्हापासून खाजगी ॲम्बुलन्स तिथे पार्किंग चालू केले गेले तेव्हापासून रुग्णांची रिक्षासाठी गैरसोय होत आहे या खाजगी ॲम्बुलन्स तिथून काढून ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये स्थलांतरित करण्यात याव्यात आणि ससून रोड येथून नो एन्ट्री मधून येणाऱ्या ऑटो रिक्षा आणि इतर वाहने यांचे प्रमाण वाढलेले असल्या कारणाने वाहतूक कोंडी होत आहे. वारंवार किरकोळ अपघात होत आहेत परंतु मोठे अपघात होण्यापूर्वीच बंडगार्डन वाहतूक विभागातर्फे वेळीच कारवाई करून उपाययोजना करण्यात याव्यात. या प्रमुख मागणीसाठी क्रांती मजदूर सेने तर्फे संस्थापक अध्यक्ष अर्जुन ओव्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर पंडागळे यांचे नेतृत्वाखाली पुणे शहर जिल्हाप्रमुख अजय शिंदे तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 24 12 2025 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जोपर्यंत प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे. प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे.
1. ससून रुग्णालयाच्या बाहेर नो पार्किंग झोन मध्ये उभे असलेल्या 30 ते 40 खाजगी ॲम्बुलन्स बेकायदेशीरपणे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या असतात त्यांना ससून हॉस्पिटलच्या आवारात स्थलांतरित करण्यात यावे किंवा त्यांचे वय कारवाई करण्यात यावी
2. स्टेशन रोड भागातून नो एंट्री मधून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर कारवाई करण्यात यावी
3. ऑटोरिक्षा मधून होणारी बेकायदेशीर प्रवासी सीट वाहतूक करणाऱ्या चालक-मालक व ऑटोशावर त्वरित कारवाई करण्यात यावी
4. ससून हॉस्पिटलच्या आवारातील जुन्या बंद पडलेल्या वाहनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी
5. व्हॅलिडीटी संपलेल्या किंवा परमिट संपलेल्या ऑटोरिक्षांवर त्वरित कारवाई करण्यात यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!