महाराष्ट्र

वाघोली वाहतुक विभागाचे अधिकारी वाहतूक नियंत्रण नव्हे तर वसुलीवर भर देत असल्याचे चित्र

अवैध प्रवासी रिक्षा (वडाप) वाहतुकीमुळे बांधकाम मजूर व कंपनी कामगार यांचा जीव धोक्यात

  1. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे ऐवजी वाघोली वाहतूक विभागाचे अधिकारी वाहतूक नियंत्रण नव्हे तर वसुलीवर भर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असते पण ही कोंडी सोडविण्याऐवजी वाहतूक पोलीस विना हेल्मेट दुचाकी वाले, भरधाव जाणारे वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणे ,कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे ,पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्या सुमार ढोबळ कारणांसाठी वाहन चालकांना अडवून दंड न करता त्यांच्याकडून चिरी मिरी घेऊन सोडून देतात. तसेच वाघोली ते शिक्रापूर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही ऑटो रिक्षा आहेत या रिक्षावाल्यांकडून वाहतूक विभागाने महिन्याला एन्ट्री फी च्या नावाखाली एक ठराविक रकमेचा हप्ता ठरवून दिलेला आहे तसेच वाघोली ते शिक्रापूर या मार्गावर काही परवाना नसलेल्या रिक्षा चालतात या विनापरवाना परमिट रिक्षा चालवण्यासाठी ही वाघोली वाहतूक विभागाला महिन्याला एक ठराविक रक्कम हप्ता म्हणून द्यावे लागत असल्याचे बोलले जाते एवढेच नाही तर पाण्याच्या टँकरच्या गाड्या , ट्रॅव्हल्सच्या बस,नियमांची पायमल्ली करणारे स्कूल बस ,मोठी अवजड वाहने यांच्याकडून वसुली केली जाते ही सर्व वसुली करण्यासाठी वाघोली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने चक्क पवार नावाच्या पोलिसाची नेमणूक केल्याची चर्चा आहे. तसेच ट्रॅफिक वॉर्डन ससाने नामक व्यक्ती सुद्धा ही वसुली करीत आहे.वाघोली ते शिक्रापूर मार्गावर तीन चाकी रिक्षा ची प्रवासी क्षमता तीन असताना सुद्धा सात ते आठ प्रवासी प्रत्येक रिक्षामध्ये भरले जातात या रिक्षाचे प्रमाण अंदाजे 200 असून अशा जवळपास 800 ते 1000 पेक्षा जास्त प्रवासी रिक्षा महामार्गावर दिवसातून धावत असतात. सदर रिक्षांमध्ये बांधकाम मजूर कंपनीतील मजूर यांचा मोठ्या प्रमाणात प्रवास होत असतो, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?. कारवाई करण्याऐवजी आर्थिक हितसंबंधांमुळे वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प बसत असल्याची चर्चा आहे . वाघोली वाहतूक विभागातील वाहतूक व्यवस्था बिघडल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या विभागातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!