महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवा – SIR प्रक्रियेसाठी पर्यायी व्यवस्था करा

जनशक्ती विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुफियान खान यांची मागणी

प्रतिनिधी पुणे शहर:-सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेमुळे पुणे शहरातील अनेक सरकारी शाळांमधील शिक्षकांना BLO (Booth Level Officer) म्हणून कामावर नियुक्त करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी अनेक ठिकाणी शाळांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन शिक्षकांना BLO म्हणून बसविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सर्वाधिक फटका बसत आहे तो सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना.
विद्यार्थ्यांचा प्रत्येक तास महत्त्वाचा असतो. शाळा बंद राहिल्याने किंवा नियमित अध्यापनात व्यत्यय आल्याने अभ्यासक्रम मागे पडतो, परीक्षेची तयारी प्रभावित होते आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. एका प्रशासकीय प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी देणे योग्य ठरू शकत नाही.
निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि BLO यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र, या कामासाठी शाळा बंद ठेवण्याऐवजी नगरसेवकांची कार्यालये, समाजमंदिरे, सार्वजनिक सभागृहे, महापालिकेची कार्यालये किंवा इतर शासकीय इमारती यांचा वापर करता येऊ शकतो. अशा ठिकाणी BLO यांची व्यवस्था केल्यास निवडणूक प्रक्रिया देखील सुरळीत पार पडेल आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणही अबाधित राहील. यासाठी जनशक्ती विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुफियान खान प्रयत्नशील असून जनशक्ती विकास संघाच्या माध्यमातून पाठपुरावा  चालू आहे

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!