महाराष्ट्र

वेळू परिसरातील प्रसिद्ध ‘आमराई रिसॉर्ट’ वेश्या व्यवसायचे केंद्र

पुणे जिल्हा प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या आणि धक्कादायक देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वेळू परिसरातील प्रसिद्ध ‘आमराई रिसॉर्ट’वर राजगड पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी धाड टाकत ही मोठी कारवाई केली. अवघ्या एक हजार रुपयांत परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या कारवाईत १३ पीडित तरुणींची सुखरूप सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या रिसॉर्टमध्ये रघु शेट्टी नावाचा इसम बाहेरून तरुणी आणून देहव्यापार चालवत असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी आधी एका बनावट (डमी) ग्राहकाला रिसॉर्टवर पाठवले. तिथे पैशांची देवाणघेवाण होऊन अवैध प्रकार सुरू असल्याचे निश्चित होताच, पोलीस पथकाने संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर अचानक छापा टाकला.
छापेमारीदरम्यान रिसॉर्टच्या वेगवेगळ्या खोल्यांची तपासणी केली असता, तिथे अवघ्या १००० रुपयांमध्ये हा धंदा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून तातडीने १३ तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. यामध्ये मुंबई आणि ठाण्यासह थेट दिल्ली, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांमधून आणलेल्या तरुणींचा समावेश आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या तरुणींना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ओढण्यात आले होते.या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात वैभव बालाजी इंगळे आणि रघु शेट्टी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वैभव इंगळे याला अटक केली असून, मुख्य सूत्रधार रघु शेट्टी हा पोलिसांची चाहुल लागताच पसार झाला. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.दरम्यान, ज्या ‘आमराई रिसॉर्ट’वर ही कारवाई करण्यात आली, ते रिसॉर्ट एका प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या मालकीचे असल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने हे रिसॉर्ट चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला करारावर दिले होते का? आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत? या सर्व बाजू पडताळून पाहण्यासाठी राजगड पोलिसांचे पथक सखोल तपास करत आहे.

 

तसेच हुक्का पार्लरला संपूर्ण बंदी असताना सुद्धा राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत खेड शिवापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखू ,गांजा,निकोटीनयुक्त हुक्का पार्लर आजुरो रेस्टॉरंट अँड बार आणि गार्गी रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. हा हुक्का पार्लर सुद्धा प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्षच्या नातेवाईकाचा असल्याची चर्चा असून राजकीय वरदहस्त व पोलिसांकडून केली जाणारी पाठराखण यांच्यामुळे हुक्का पार्लर व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी एक वसुली अधिकारी नेमला असून त्याचे पाठबळामुळेच हे व्यवसाय सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!