महाराष्ट्र

९ मार्च – क्रांती दिनाच्या निमित्ताने माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदेचा अन्नत्याग सत्याग्रह

पुणे प्रतिनिधी – सन १९४२ साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली“भारत छोडो” आंदोलनाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला.आज त्याच जिद्दीने माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद तर्फे 9 मार्च क्रांती दिनी पुणे महानगर-पालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आवाज  उठवन्यासाठी पारदर्शक व जबाबदार प्रशासनासाठी अन्नत्याग सत्याग्रह केला जाणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.श्री विलास नवाळी,२)श्री राजेश खाडे,३)श्री मयुर गेडाम,४)राहुल साळुंखे ५)श्री निशिकांत छापेकर,६)श्री मुकुंद बर्वे- कार्यकारी अभियंता टीडीआर सेल,७)श्रीमती आशालाता साळवी-उप अभियंता टीडीआर सेल पुणे महानगरपालिका यांचे विरोधात सदर आंदोलन असणार आहे. अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद संस्थापक अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्यायव विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!