वाघोली वाहतूक पोलिसांचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना विशेष पाठबळ
अमोल सोडगीर करतोय रिक्षाचालकांवर अरेरावी,दमदाटी, गुंडगिरी
पुणे शहर प्रतिनिधी: पुणे शहरानजीक मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेले वाघोली शहर येथे मजूर कामगार श्रमिक वर्ग यांची मोठ्या प्रमाणे वर्दळ असते. पर-राज्यातून आलेल्या मजुरांना कामगारांना स्वतःच्या वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे ते रिक्षा किंवा इतर वाहनांद्वारे प्रवास करीत असतात त्यामुळे रस्त्याला अवैद्य प्रवासी वाहतुकीचे पेव फुटलेले आहेत. त्यामध्ये खाजगी वाहनांना काळया रंगाचे फिल्मिंग लावून पांढरी नंबर प्लेट असलेले वाहने ही मोठ्या प्रमाणात येरवडा ते अहिल्यानगर किंवा वाघोली ते अहिल्यानगर अशी सर्रासपणे धावतात त्यामध्ये तेथील वाहतूक पोलिसांचे त्यांना नेहमीच पाठबळ असते येरवडा वाहतूक पोलीस व वाघोली वाहतूक पोलीस यांचे दरमहा हप्ते बांधलेले असतात. अशातच आता गुंड प्रवृत्तीच्या वाहन चालकांकडून स्थानिक रिक्षा चालकांवर अरेरावी, शिवीगाली,गुंडगिरी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
सध्याच्या परिस्थितीत अमोल सोडगीर नावाचा खाजगी प्रवासी वाहतूक करणारा इको चालक (MH16 DS 4274) हा रिक्षावाल्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला या संदर्भात आमचे प्रतिनिधी रिक्षाचालक जितेंद्र इंगळे यांनी विचारणा केली असता त्यांना अरेरावी करून शिवीगाळ करून तुला गाडीच्या खाली घेईन अशी धमकी दिलेली आहे.त्याला वाघोली वाहतूक पोलीस किंवा येरवडा वाहतूक पोलीस कोण पाठीशी घालत आहे? त्याला कोण पोसत आहे? याचा खुलासा आम्ही पुढच्या बातमीत करू.




