भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांनी केले होते आयोजन

पुणे प्रतिनिधी – भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती मोठ्या उत्साह मध्ये साजरी करण्यात आली यामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड,तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष राजेश आढाव,तक्षशिला बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष विजय नाना बोकेफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, त्यानंतर श्रेयस शिंदे यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या तसेच सौम्य सोलंकी या बालिकेने बाबासाहेबांच्या जीवनावर इंग्रजीमध्ये भाषण केले.

त्याचप्रमाणे शाम गायकवाड, राजेश आढाव यांनी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांच्या हस्ते उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले तदनंतर तक्षशिला बुद्ध विहाराच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तसेच लेझीम संघासाठी ज्यांनी साऊंड फ्री दिलेला आहे ते शाम नागवी यांचा सन्मान शाम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांनी केले होते यावेळी बाबासाहेब सोनवणे, रितेश गायकवाड, निखिल गायकवाड, धनराज बनसोडे प्रेम कांबळे उपस्थित होते.



