टॉप न्यूज़

क्रांती मजदूर सेनेच्या वतीने कोरेगाव पार्क येथे भव्य ध्वजारोहण व नूतन शाखा उद्घाटन सोहळा संपन्न

एस.बी.एन ग्रुप चे सूर्यकांत निकाळजे व सामाजिक कार्यकर्त ॲड यश वालिया यांचे हस्ते ध्वजारोहण, शाखा उद्घाटन, लहान मुलांना खाऊवाटप

पुणे जिल्हा प्रतिनिधी : १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांती मजदूर सेना, पुणे शहर शाखेच्या वतीने कोरेगाव पार्क येथे भव्य ध्वजारोहण व नूतन शाखा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. एस बी एन ग्रुपचे सूर्यकांत उर्फ सोनू निकाळजे व सामाजिक कार्यकर्ते ॲड यश वालिया यांच्या हस्ते ध्वजारोहण ,नूतन शाखा उद्घाटन करण्यात आले.

यावेळी क्रांती मजदूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन ओहोळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे होते.

क्रांती मजदूर सेना पुणे शहर युवा अध्यक्ष किशोर दुर्भे यांचे नेतृत्वाखाली शाखाध्यक्ष सैफान शेख व शाखा उपाध्यक्ष उमेश जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरेगाव पार्क नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले व परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

कोरेगाव पार्क परिसरातील स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, शोषित,असंघटित,श्रमिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे युवा शहराध्यक्ष किशोर तुर्भे यांनी सांगितले तसेच उपस्थितांना संबोधित करताना संघटनेची ध्येय,धोरणे व भविष्यातील वाटचाल, संघटन वाढीसाठी संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित एसबीएन ग्रुपचे प्रशांत कसबे, क्रांती मजदूर सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर पंडागळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष परविन शेख, पुणे शहर उपाध्यक्ष रागिनी गुंजाळ, क्रांती मजदूर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!