टॉप न्यूज़

रिपब्लिकन सेनेची सोलापूर शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी, नव्या निर्धाराची शपथ.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी:सोलापूर येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि युवा नेते अमन आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. 13 मे रोजी रिपब्लिकन सेनेची बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, यांच्या सह महाराष्ट्र प्रदेश सचिव सोमनाथ अरुण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे संपन्न झाली.

संघटन मजबूती व पक्ष विस्ताराच्या दृष्टीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

सोलापूर शहरात विविध नेतृत्वाची निवड करण्यात आली ज्यामध्ये सोलापूर शहराध्यक्ष – शरणु हजारे,शहर उपाध्यक्ष – किरण जौंजट,शहर संपर्कप्रमुख – विकी बनसोडे,शहर मीडिया प्रमुख – सद्दाम पठाण,अल्पसंख्याक महिला शहराध्यक्षा रेश्मा मंगलगिरी यांची प्रमुख नियुक्ती करण्यात आली.त्याचबरोबर सोलापूर जिल्हा व लोकसभा क्षेत्रात सुद्धा विविध पदांवर पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.सोलापूर लोकसभा युवक जिल्हाध्यक्ष-विश्वजीत सरवदे,सोलापूर लोकसभा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष – महीबूब शेख,सोलापूर लोकसभा संघटक – सिद्धार्थ कांबळे,सोलापूर लोकसभा जिल्हा संघटक दाऊद मुलाणी,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष वाहिद मुस्तफा,तसेच माढा लोकसभा महिला जिल्हाध्यक्ष पदी कुर्डवाडीच्या आशाताई रिकिबे यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना अमित कांबळे यांच्या हस्ते आणि आशाताई रिकीबे यांना सोमनाथ भोसले यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, याप्रसंगी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देत एकजुटीने राहून निरंतर कार्य करत राहण्याचा संदेश दिला.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्यायव विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!