टॉप न्यूज़

पुण्याचे पर्यावरण व पाचगाव–पर्वती टेकडी वाचवण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदेचे उद्या धरणे आंदोलन

पुणे शहर प्रतिनिधी: पुण्याचे पर्यावरण व पाचगाव पर्वती टेकडी वाचविण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद यांचे वतीने उद्या दिनांक 18 मे 2026 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आवाहन केले आहे तसेच पुणेकर जनतेच्या हक्कासाठी लढणार,भूमाफियांपुढे झुकणार नाही!,पाचगाव–पर्वती टेकडी वाचवून — पुण्याचे फुफ्फुसे वाचविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

📢 आंदोलनाच्या प्रमुख मागण्या 📢
▪️ आनंद विहार येथील पाचगाव–पर्वती टेकडी फोडून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करणाऱ्या श्रीमती मीना अरुण आपटे श्री प्रकाश अरुण आपटे श्रीमती गौरी विकास आपटे श्रीमती सुचिता प्रदीप पावगी, श्री आर्यन विकास आपटे,श्री भरत मोहनलाल सोळंकी,श्री जयवंत जयेश मोहनलाल सोळंकी,श्री संजय उत्तमराव काळभोर या भूमाफियांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.
▪️ पाचगाव–तळजाई टेकडी परिसरातील गौण खनिज उत्खनन प्रकरणातील शासनाचा दंड तात्काळ वसूल करावा अथवा संबंधित जमीन शासन दप्तरी जप्त करण्यात यावी.
▪️ बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी.
▪️ बीडीपी झोनमधील अनधिकृत प्लॉटिंग व विक्री व्यवहार बंद करून नागरिकांची फसवणूक थांबवावी.
▪️ सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असूनही कारवाई का होत नाही याची चौकशी करण्यात यावी.
▪️ संबंधित भूमाफिया सिंडिकेटचा पर्दाफाश करून SIT व CID मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
▪️ मौजे हिंगणे, ता. हवेली, जि. पुणे येथील बेकायदेशीर कामांना संरक्षण देणाऱ्या संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन करून चौकशी करण्यात यावी.
▪️ ETS संयुक्त मोजणी करून प्रत्यक्ष किती उत्खनन झाले याचा सार्वजनिक अहवाल जाहीर करण्यात यावा.
▪️ पर्यावरण नष्ट करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करून शासन महसूल वाचवावा.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्यायव विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!