महाराष्ट्र

प्रभाग क्रमांक 10 कोथरूड-बावधन-भुसारी या प्रभागाच्या रिपाई(आठवले)च्या अध्यक्षपदी सुजल नितवने

प्रतिनिधी पुणे शहर:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पुणे शहर ख्रिश्चन आघाडीच्या वतीने पक्षप्रवेश व पदभार सोहळा आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमांमध्ये पुणे शहराचे अध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहराचे उपमहापौर परशुराम वाडेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिला आघाडीच्या अध्यक्ष कार्यक्षम नगरसेविका कु. हिमाली कांबळे,युवक आघाडी संघटक महाराष्ट्र प्रदेश उमेश कांबळे, सरचिटणीस पुणे शहर शाम सदाफुले, आयु.महिपाल वाघमारे, यावेळी पुणे शहर ख्रिश्चन आघाडीचे असंख्य पदाधिकारी, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला

पुणे शहराचे उपमहापौर आयु परशुराम वाडेकर यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 10 कोथरूड बावधन भुसारी
या प्रभागाच्या अध्यक्षपदी सुजल नितवने यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री (भारत सरकार ) यांचे हात बळकट करण्यासाठी प्रभागातील हजारो युवक , पक्षात सहभागी करून पक्ष वाढीचे काम करेल अशी सुजल नितवने यांनी ग्वाही दिली.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!