महाराष्ट्र
अखिल गणंजय मित्र मंडळातर्फे गणेश जन्म सोहळा उत्साहात साजरा
कोथरूड येथील डी. पी. रोडचा राजा

पुणे शहर- प्रतिनिधी. कोथरूड येथील डी.पी.रोडचा राजा अखिल गणंजय मित्र मंडळातर्फे गणेश जन्म सोहळा तथा गणेश जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले होते त्यामध्ये गणेशयाग, महाप्रसाद व भजन आधी कार्यक्रमांचा समावेश होता.

कार्यक्रमाला नवनिर्वाचित पुणे महानगरपालिका नगरसेवक पृथ्वीराज उर्फ दादा सुतार,दिनेश माथवड,ज्योत्स्ना कुलकर्णी, उद्योजक समीर पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.



