सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर युवा भीमसेनेचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू
ठोस कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांसमोर निषेध आंदोलन व आत्मदहन करणार

सोलापूर शहर व परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर टोल नाके व सोलापूर अक्कलकोट रोड वरील एमआयडीसी येथे अवैधपणे चालू असलेले मंगल कार्यालय बंद करावे या प्रमुख मागणीसाठी युवा भीम सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू असून वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याकारणाने हे उपोषण चालू आहे
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे,
1)सोलापूर एमआयडीसी येथील बेकायदेशीरपणे चालू असलेले टोलनाके तात्काळ बंद करण्यात यावेत
2)सोलापूर अक्कलकोट रोड येथील एमआयडीसी मधील कारखाने बंद करून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू केलेले मंगल कार्यालय कायमचे बंद करण्यात यावे
3) सोलापूर येथील एमआयडीसी मधील कामगारांची फसवणूक करून कमी पगार देणाऱ्या कारखानदारांवर कायदेशीर कारवाई करून कामगारांना प्रती तास शंभर रुपये प्रमाणे वेतन अदा करण्यात यावे
सदर आमरण उपोषण युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली दिनांक 21 जानेवारी 2026 पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू असून उपोषणकर्ते विकास गायकवाड, नागेश दासरे व रमेश पद्मा हे करीत आहेत. लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जे बंदुकी ने गोळ्या मारण्याची स्टाईल करून हातवारे करत आहेत त्यांचे समोर 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनी संघटने तर्फे निषेध आंदोलन करणार आहोत आणि आत्मदहन आंदोलन करणार आहोत असे कळविण्यात आले आहे



