महाराष्ट्र

मूकनायक वृत्तपत्राचा 106 वा वर्धापन दिन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्र याचा शुभारंभ केला. त्यानंतर बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशी एकूण पांच वृत्तपत्र चालवली. जनता हे सर्वाधिक काळ चाललेले वृत्तपत्र.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलीच गोष्ट विनाकारण किंवा मिरवण्यासाठी केली नाही प्रत्येक कृती मागे एक ठोस लक्ष आणि भूमिका होती. विशेष म्हणजे सुरुवातील डॉ बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजीतून लिहित आणि त्याचे भाषांतर करून मराठीत छापले जाई. पण पुढे त्यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले आणि ते थेट मराठी भाषेत लिहित.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांची वृत्तपत्र सुरू करण्यामागे पहिला हेतू तत्कालीन अस्पृश्यांच्या प्रश्नाला सवर्ण समाज आणि सरकार समोर आणणे थोडक्यात व्यवस्थेला आरसा दाखवणे हा होता. दुसरा हेतू विरोधकांना चोख उत्तर देणे. कारण मूकनायक आपण का सुरू करीत आहोत याची भूमिका मांडताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होते की, वर्तमान परिस्थिती जी वृत्तपत्र आहेत त्यात अस्पृश्यांच्या प्रश्नाला योग्य जागा आणि आवाज मिळत नाही आणि तिसरा हेतू हा होता की, प्रत्येक सामाजिक चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी चळवळीचे स्वतःचे वर्तमान पत्र हवे असते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वरील पांच वृत्तपत्रातील पत्रकारिता पाहिली तर आपल्याला हे स्पष्ट जाणवते. चांगली पत्रकारिता कशी करावी याचा वस्तुपाठ सुमारे 33 वर्ष वृत्तपत्रे चालवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दाखवून दिले.
मात्र आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा संदर्भ फार कमी प्रमाणात पुढे आणला जातो. माझ्यासाठी पत्रकारितेची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दीनबंधू ने सुरुवात होऊन गोपाळबाबा वलंगकर, किसन फागु बनसोडे, शिवराम जानबा कांबळे येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत हा वारसा येतो.
पत्रकारिता हा समाज सुधारणेचा आणि नवक्रांतीचा पाया सदैव राहिला आहे. पत्रकारितेची ताकत ही अफाट आहे. पत्रकारिता हे एक शस्त्र आहे ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेले तर समाज आणि देशाचे न भरून येणारे नुकसान होत असते आणि ते योग्य व्यक्तीच्या हाती असले तर त्यातून बदल घडून येतो
आजकालची पत्रकारिता ही बिन चेहऱ्याची झाली आहे. पत्रकार हा टूल म्हणून वापरला जात आहे त्यामुळे. पत्रकाराच्या चेहऱ्यावर जो स्वाभिमान , अस्मिता आणि स्वातंत्र्येचा भाव लोप पावला आहे आणि एक रोजगार. पोटापाण्याची सोय म्हणून राहिला आहे.
त्याला अनेक सामाजिक, आर्थिक , व्यवस्थेची आणि जागतिक कारणे आहे. एकूणच समाज बेशरम करून टाकण्याचे जे षडयंत्र राबवले जात आहे त्यात कुणीच स्वतंत्र, प्रामाणिक राहू नये याची काळजी घेतली जाते आहे. मग मतदार, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, अधिकारी ते विचारवंत असे सर्वच बाजारात उभे ठाकले आहेत त्याचेच पाणी पत्रकारितेत मुरले आहे त्यामुळे बिनचेहऱ्याची , बिनलक्षाची आणि बिन अस्मितेची पत्रकारिता मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या हीच सदिच्छामहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक वृत्तपत्राच्या 106 व्या वर्धापन दिनानिमित शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!