ससून रुग्णालया बाहेर खाजगी ॲम्बुलन्सची पुन्हा जैसे थे परिस्थिती…
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत दिशाभूल
बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये ससून रुग्णालय बाहेर बेकायदेशीरपणे पार्क केलेली रुग्णवाहणे (ॲम्बुलन्स )यांच्यावर कारवाई करणेबाबत क्रांती मजदूर सेनातर्फे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर पंडागळे यांचे नेतृत्वाखाली मागील महिन्यात 24 12 2025 पासून धरणे आंदोलन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त हिम्मतराव जाधव वाहतूक शाखा मुख्यालय येरवडा यांचे कार्यालय समोर करण्यात आले होते. त्यावेळेला सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे यांनी वाहतूक मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे यांना कारवाई केली असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे यांनी पोलिस उपयुक्त हिम्मतराव जाधव यांना क्रांती मजदूर सेनेच्या शिष्टमंडळा समोर कारवाई केली असल्याचे सांगितले. परंतु त्यावेळेला त्यांनी कारवाई न करता सदर खाजगी रुग्णवाहणे तथा ॲम्बुलन्स धारकांना येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून तुम्ही तात्पुरती ॲम्बुलन्स ची पार्किंग ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये करावी असे सांगितले होते. आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. परंतु संघटनेच्या शिष्टमंडळाला कारवाई केले असल्याचे खोटे सांगून संघटनेची दिशाभूल केलेली आहे. सध्याच्या घडीला पुन्हा त्याच प्रकारे खाजगी रुग्णवाहणे तथा ॲम्बुलन्स मोठ्या प्रमाणात पार्क केलेली आहेत. ससून रुग्णालयाबाहेर पार्किंग केलेल्या खाजगी रुग्णवाहणे तथा ॲम्बुलन्स मध्ये पत्ते खेळणे,जुगार खेळणे,दारू पिणे, रात्रीच्या वेळेस महिलांना ॲम्बुलन्स मध्ये घेऊन बसणे अश्लील चाळे करणे असे प्रकार होत आहेत. तसेच अजूनही स्टेशन रोड भागातून नो एन्ट्री मधून रिक्षा किंवा इतर वाहने येत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. तसेच ऑटो रिक्षा मधून होणारे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक-मालक व ऑटो रिक्षा यांचे वर कारवाई होत नाही. जैसे थे अशी परिस्थिती आहे.

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे यांनी वसुलीसाठी केकान नावाचा पोलीस कर्मचारी नेमलेला असून तो प्रत्येक ॲम्बुलन्सच्या मागे दरमहा ठराविक रकमेचा हफ्ता घेत असल्याचे चर्चा आहे त्यामुळे सदर खाजगी ॲम्बुलन्स वर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.तसेच बेकादेशीर पणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या सीट वाहणाऱ्या ऑटोरिक्षा यांचे कडून ठराविक रक्कम दरमहा हफ्त्याच्या स्वरूपात घेतली जात आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे हे कारवाई केली असल्याचे सांगून संघटनेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संघटनेच्या वतीने 3 फेब्रुवारी 2026 पासून पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे




