भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस करीत आहेत मोठ्या प्रमाणात वसुली, म्हणून तर अवैध प्रवासी वाहतूक जास्तच खुलत गेली
भारती विद्यापीठ वाहतूक विभाग म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी-वसुली बहाद्दर भोरडे ,कोळी, संकपाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा

पुणे -प्रतिनिधी
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे अधिकारी वाहतूक नियंत्रणावर नव्हे तर वसुलीवर भर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असते पण ही कोंडी सोडवण्याऐवजी वाहतूक पोलीस विना हेल्मेट दुचाकी वाले, भरधाव जाणारे वाहन चालक,विनापरवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे ,ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे पीयूसी प्रमाणपत्र नसणे आधी नेहमीच्या सुमार ढोबळ कारणांसाठी वाहन चालकांना अडवून दंड न करता त्यांच्याकडून चिरीमेरी घेऊन सोडून देतात त्याचे कारण असे की भारती विद्यापीठ येथे शिक्षणासाठी बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्त्याना धमकावून दमबाजी करून असे प्रकार रोजच घडत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच कात्रज येथून कात्रज ते भोर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही वडापच्या गाड्या आहेत या गाड्यांचा वाहतूक विभागाने महिन्याला एक ठराविक रकमेचा हप्ता ठरवून दिला आहे,तसेच कात्रज ते स्वारगेट,कात्रज ते चांदणी चौक, कात्रज ते मंतरवाडी या मार्गावर काही परवाना नसलेल्या रिक्षा चालतात या विनापरवाना (परमिट) रिक्षा चालवण्यासाठी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला महिन्याला एक ठराविक रक्कम हप्ता म्हणून द्यावी लागत असल्याचे बोलले जाते एवढेच नाही तर पाण्याचे टँकर,भंगारच्या गाड्या, व नियमांची पायमल्ली करणाऱ्या स्कूलबस यांच्याकडूनही महिनेवारी वसुली केली जाते ही सर्व वसुली करण्यासाठी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने चक्क भोरर्डे,कोळी, संकपाळ नावाच्या पोलिसांची नेमणूक केल्याची चर्चा आहे. कात्रज येथून भोर, सातारा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे कात्रज चौक येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असून त्या चौकातून रस्ता काढणे तसेच चौकामध्ये विनापरवाना रिक्षा चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे मात्र ही होत असलेली वाहतूक कोंडी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडून सुरळीत करण्याऐवजी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, कार, भंगारच्या गाड्या,पाण्याचे टँकर,स्कूल बस, खाजगी प्रवासी बस, चालकाकडून वसुली करीत फिरत असतात.अवैध वाहतूक करणारे मोटर चालक रिक्षा चालक हे पोलिसांना हप्ता देत असल्यामुळे अरेरावी करून गाड्या मोठेपणाने आडव्या तिडव्या कुठेही आणि कशाही गाड्या उभ्या करत असतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्याकडे मात्र वाहतूक पोलीस जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.



