टॉप न्यूज़

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या ठाम आणि निर्भीड आंदोलनामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली

नाशिक कुंभमेळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून सक्तीने काम करून घेऊन त्याबदल्यात गुण देण्याचा, विद्यार्थ्यांच्या हक्कांवर अन्याय करणारा आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला रद्द करावा लागला. हा आदेश म्हणजे शोषणाला प्रोत्साहन देणारा होता, आणि त्याविरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने ठाम भूमिका घेतली.

हा केवळ आदेश रद्द झाल्याचा मुद्दा नसून, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मिळवलेला एक महत्त्वाचा विजय आहे.

इंदू मिल स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन प्रभावीपणे उभे राहिले आणि सत्तेला माघार घ्यायला भाग पाडले. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य, विवेक आणि संविधानिक मूल्ये.

विद्यार्थ्यांच्या हक्कांवर आघात झाला, तर रिपब्लिकन विद्यार्थी सेना गप्प बसणार नाही असा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी दिला आहे.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!