महाराष्ट्र

माता रमाईस अनोखे अभिवादन- 39 कोटींची साडी आणि कुंकवाच्या जागी 33 कोटींचे हिरे.

भीमसैनिक रोहित पिसाळ यांचे अनोखे अभिवादन

मुंबई : बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिकता यावे म्हणून मुंबईत अतिशय गरिबीत दिवस काढून हालअपेष्टा सोसणाऱ्या त्यागमुर्ती माता रमाई यांची आज जयंती… त्यांच्या जयंतीला तब्बल ३९ कोटींची साडी बनविण्यात येत आहे.

या साडीसाठी ३३ कोटींचे हिरे आणि दोन किलो सोन्याचा वापर होणार आहे. माता रमाईंच्या स्मरणार्थ गोल्डन मॅन रोहित पिसाळ यांनी ही साडी बनवली आहे.

संपूर्ण साडीवर सोन्याचा मुलामा चढविण्यात येत आहे. माता रमाई यांच्या कपाळावरील कुंकवाच्या जागी ३३ कोटींचे हिरे लावण्यात येणार आहेत. जगातला कोणताही मुलगा आपल्या आईसाठी काहीतरी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईसाठी माझ्या कमाईतून भेट देण्याचा निश्चय केला आहे, असे गोल्डन मॅन रोहित पिसाळ म्हणाले.

ही साडी तयार झाल्यानंतर एक महिनाभर भारतभर फिरविण्यात येणार आहे. त्यानंतर लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ही साडी प्रदर्शनासाठी देण्यात येईल, असे पिसाळ यांनी सांगितले. लंडनमध्ये उपाशी राहून बाबासाहेबांनी आमच्या बहुजन समाजासाठी अभ्यास केला. त्यासाठी माझ्या रमाई माऊलीने मोठा त्याग केला. मुंबईत खूप हलाखीचे दिवस काढले. बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाई मातेचं मोठं योगदान राहिले आहे, अशा भावना पिसाळ यांनी व्यक्त केल्या.

कोण आहेत गोल्डन मॅन रोहित पिसाळ?

रोहित पोपट पिसाळ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. ‘गोल्डमॅन’ म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे.
पाण्याखालील सोन्याच्या खाणकामात त्यांचा व्यवसाय आहे
क्षुशा फॅशन हाऊसचे संस्थापक आहेत
रोहित पिसाळ यांनी कठीण आजारातून सावरत, इंडोनेशियामध्ये सोन्याच्या खाणकामाचे प्रकल्प राबवले आहेत
ते सोन्याचे बुद्ध लॉकेट परिधान करण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासासाठी चर्चेत असतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!