शिक्षकेतर संघटनेचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन १ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत
बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना

मुंबई प्रतिनिधी:- शिक्षकेतर संघटनेचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई येथे रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदान, टिळक नगर, चेंबूर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. याची अधिकृत घोषणा शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह मा. श्री. शिवाजीराव खांडेकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत केली.
या अधिवेशनाचे आयोजन बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात येत असून, त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनास राज्यभरातील शिक्षकेतर बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष तथा मुंबई अध्यक्ष प्रा. देविदास पंडागळे, राज्य उपाध्यक्षा मा. श्रीम. सुप्रिया पवार आणि मुंबई सरकार्यवाह मा. श्री. सुनील खाडे यांनी केले आहे.




