राष्ट्रहित संघटनेचे अश्रू खवळे यांचे विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू
प्रमुख मागणी- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक उद्यान अधीक्षक श्रुती नाझिरकर व सदस्य सचिव कार्यालय पुणे सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे यांचे विरुद्ध विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी .
पुणे शहरात पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून सातत्याने होत असलेला निष्काळजी, मनमानी व बेजबाबदार कारभार याविरोधात राष्ट्रहित संघटना संस्थापक अध्यक्ष अश्रू खवळे यांचे नेतृत्वाखाली दिनांक 09/02/2026 सकाळी 10:00 पासून मागणी पूर्ण होई पर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे.
वृक्षतोडीसाठी नियमबाह्य परवानग्या, पर्यावरण तज्ञांच्या अहवालांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, नागरिकांच्या तक्रारींकडे डोळेझाक, तसेच पर्यावरणीय कायद्यांचे सर्रास उल्लंघन हे प्रकार गेल्या काही काळापासून वाढले आहेत. शहरातील झाडे व हिरवळ नष्ट होत असताना वृक्ष प्राधिकरण मात्र मूक प्रेक्षक बनून बसले आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
खवळे यांनी वारंवार लेखी तक्रारी, निवेदने व प्रत्यक्ष भेटीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने आमरण उपोषण हाच शेवटचा पर्याय उरला आहे.
प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे



