९ मार्च – क्रांती दिनाच्या निमित्ताने माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषदेचा अन्नत्याग सत्याग्रह

पुणे प्रतिनिधी – सन १९४२ साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली“भारत छोडो” आंदोलनाने इंग्रजांविरुद्ध लढा दिला.आज त्याच जिद्दीने माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद तर्फे 9 मार्च क्रांती दिनी पुणे महानगर-पालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवन्यासाठी पारदर्शक व जबाबदार प्रशासनासाठी अन्नत्याग सत्याग्रह केला जाणार आहे. या अधिकाऱ्यांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.श्री विलास नवाळी,२)श्री राजेश खाडे,३)श्री मयुर गेडाम,४)राहुल साळुंखे ५)श्री निशिकांत छापेकर,६)श्री मुकुंद बर्वे- कार्यकारी अभियंता टीडीआर सेल,७)श्रीमती आशालाता साळवी-उप अभियंता टीडीआर सेल पुणे महानगरपालिका यांचे विरोधात सदर आंदोलन असणार आहे. अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद संस्थापक अध्यक्ष किशोर कांबळे यांनी दिली




