टॉप न्यूज़

बहुजन समाज पक्ष आयोजित पुणेकरार धिक्कार परिषद संपन्न

बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय कॉर्डिनेटर तथा महाराष्ट्र कर्नाटक प्रदेशचे प्रभारी दिनेश गौतम यांनी केले मार्गदर्शन

प्रतिनिधी पुणे जिल्हा:-बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा आयोजित संत गाडगेबाबा अकूल धर्म शाळेतील पुणे करार धिक्कार परिषदेचा कार्यक्रम नुकताच यशस्वी रित्या पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय कॉर्डिनेटर तथा महाराष्ट्र कर्नाटक प्रदेशचे प्रभारी दिनेश गौतम यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुनील डोंगरे यांनी पुणे कराराचे नुकसान कार्यकर्त्यांना समजून सांगितले आणि त्यातून चमचे दलाल कसे फायदा झाले हे सांगितले चमचे किती प्रकारचे असतात हे सुद्धा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
त्याचबरोबर पुणे खांदेश झोनचे मुख्य निरीक्षक डॉक्टर रामचंद्र जाधव तसेच महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव  किरण आल्हाट  व महाराष्ट्र प्रदेशचे सचिव राजेश चव्हाण यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्ह्याचे महासचिव प्रवीण वाकोडे यांनी केले त्यावेळी पुणे जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व जिल्ह्यातील सर्व विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर बूथ अध्यक्ष व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविणार्या सर्व कार्यकर्त्यांचे खुप खुप आभार

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!