टॉप न्यूज़

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद धोक्यात

रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र

मुंबई प्रतिनिधी:-कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना कार्यवाहीसाठी पत्र पाठवले आहे. या प्रकरणी काही तक्रार असल्यास शासनाच्या नगरविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आयोगाने तक्रारदार कल्पेश गंगाराम जोशी यांना कळवले आहे.

महापालिका सदस्यांना अपात्र ठरवण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १०(१)(ड) नुसार संबंधित कार्यवाही करण्याची जबाबदारी अन्य सक्षम प्राधिकरणाकडे असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

रमेश म्हात्रे यांच्या नगरसेवक पदाच्या अपात्रतेच्या मागणीसाठी कल्पेश जोशी यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. निवडणूक आयोगाकडून कार्यवाहीसंदर्भात पत्र मिळाल्यानंतर त्यांनी हे उपोषण काही काळासाठी स्थगित केले आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना रमेश म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाशी संबंधित माहितीबाबत प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच त्यांच्या मुलाच्या नावाशी संबंधित कथित बनावट कागदपत्रे आणि अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणातही तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणात महसूल विभागाने संबंधित सातबारा उतारे बनावट असल्याचे स्पष्ट केल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या सात महिन्यांपासून आपण निवडणूक आयोग, नगरविकास विभाग आणि कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे कल्पेश जोशी यांनी सांगितले. आता निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर संबंधित प्राधिकरणाकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!