टॉप न्यूज़

बावधन बुद्रुक येथील मार्बल मार्केटमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा आरोप, पुणे मनपाकडे तातडीने कारवाईची मागणी

पुणे मनपा बांधकाम विकास विभाग झोन 3 चे कार्यकारी अभियंता मुकुंद बर्वे, उपअभियंता भास्कर हांडे, कनिष्ठ अभियंता अजय फाले यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

 

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बावधन बुद्रुक, मुंबई-बंगळूर महामार्गावरील गट नं. २९४ आणि ३१४ मधील मार्बल मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप “कामगार न्याय सुरक्षा” वृत्तपत्राचे संपादक अमर मारुती पंडागळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ४ जून २०२६ रोजी पुणे महानगरपालिका आयुक्त, शहर अभियंता आणि बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक ३ च्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?
तक्रार अर्जानुसार, शोनक टोयोटा जवळील मार्बल मार्केट परिसर हा राखीव/प्रतिबंधित क्षेत्रात येतो. मात्र येथे एका भाजपा नगरसेवकाच्या नातेवाईक व मर्जीतील लोकांकडून लोखंडी पाइप, स्टीलच्या पत्र्याचे आणि सिमेंटचा वापर करून मोठे शेड आणि मोठ्या प्रमाणात गोडाऊनची अनधिकृत बांधकामे पूर्ण झालेली आहेत व आजमितीस सुरू देखील आहेत.

श्री. अमर पंडागळे यांनी आरोप केला की, ही सर्व बांधकामे पूर्णतः अनधिकृत असून पुणे महानगरपालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय आणि ना हरकत प्रमाणपत्राशिवाय केली जात आहेत. त्यामुळे हे क्षेत्र “रेड झोन” संवर्धन क्षेत्रात मोडत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

नियमांचा भंग आणि नागरिकांना त्रास
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचा व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत.
यामुळे परिसरात वाहतुकीला अडथळा, पाणी समस्यांसह शहराच्या नियोजनात व्यत्यय येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कारवाईची मागणी:-

श्री. पंडागळे यांनी पुणे मनपाला पुढील मागण्या केल्या आहेत:
1. सदर ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम तातडीने थांबवावे
2. अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करावी
3. दोषींवर दंडात्मक कारवाई करावी व पोलीस फौजदारी (एफ आय आर) गुन्हा दाखल करावा तसेच…
4. केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदाराला पाठवावा.

फोटोतून काय दिसते?
तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये “STONE WORLD”, “STONE NATURAL”, “ROCK NATURE” “BHARAT BENZ”,”SKODA”अशा पाट्या असलेली मोठी गोदामे आणि शेड दिसत आहेत. परिसरात गाड्या, ट्रक उभे असून काही ठिकाणी रस्ता कच्चा आहे.

या प्रकरणामुळे पुणे महानगरपालिका आता काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये अशा अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनावर होणाऱ्या परिणामांबाबत नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!