महावितरणचा मोठा निर्णय: अनधिकृत व्यक्तींकडून कामे करून घेण्यास पूर्णपणे बंदी!

पुणे शहर प्रतिनिधी : महावितरणच्या कामांवर खासगी किंवा अनधिकृत व्यक्तींचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर आता थेट बडतर्फ/सेवा समाप्तीची कारवाई होणार आहे. संचालक (संचालन) कार्यालयाकडून २४ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात कडक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:
कामांचा गैरवापर: रोहित्र बदलणे, DO Fuse टाकणे, बिघाड दुरुस्ती किंवा मीटर काढणे यांसारखी तांत्रिक कामे महावितरणचे तंत्रज्ञ/कर्मचारी स्वतः न करता खासगी व्यक्तींकडून करून घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जीवितहानीचा धोका: अनधिकृत व्यक्तींकडून कामे करून घेतल्यामुळे अपघातांचा धोका वाढतो तसेच ग्राहक आणि कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान होते.
कठोर कारवाई: विद्युत सुरक्षेच्या नियमांनुसार अशी कामे केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनीच करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून खासगी व्यक्तींचा वापर केल्यास संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करून थेट सेवेतून बडतर्फ (Dismissal) केले जाईल.
महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना यावर तातडीने व काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



