मनसे गोरेगाव विभागाच्या शिवजयंती सोहळ्यात प्रा. देविदास पंडागळे यांचा सन्मान
मराठीच्या गळचेपीवर परखड भाष्य

मुंबई प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गोरेगाव विभाग (राजगड ५८) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील नेते व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर म्हणून प्रा. देविदास पंडागळे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना प्रा. देविदास पंडागळे यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर परखड मत व्यक्त केले. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान असला तरी दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारात मराठी भाषेची होत असलेली गळचेपी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठीचा सन्मान केवळ घोषणांपुरता न राहता शिक्षण, प्रशासन आणि दैनंदिन व्यवहारात तिचा सन्मानपूर्वक वापर वाढला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन संजय खानोलकर (शाखा अध्यक्ष), दीपक पवार, नरेश चड्डा आणि मयूर शार्दुल यांनी केले होते. कार्यक्रमास सुनील खाडे (मनसे, कुर्ला विभाग उपाध्यक्ष) हे प्रमुख उपस्थित होते. तसेच श्रमिकराज जनआंदोलन चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




