नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पुढाकाराने बावधनमध्ये अनधिकृत RMC प्लांट विरोधात जनआंदोलन

पुणे प्रतिनिधी -भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पुढाकाराने आज बावधन बुद्रुक येथील ओंकार गार्डन चौक येथे अनधिकृत RMC प्लांट व मोठ्या अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीच्या विरोधात नागरिकांचे जोरदार जनआंदोलन पार पडले. या आंदोलनाला बावधन परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
बावधन परिसरात सुरू असलेले अनेक RMC प्लांट हे अनधिकृत असून त्यांना आवश्यक शासकीय परवानग्या नसल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे मांडले. या प्लांटमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ, प्रदूषण व अवजड ट्रकची सततची वाहतूक होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच अपघातांची शक्यता देखील वाढली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अनधिकृत RMC प्लांट तात्काळ बंद करण्यात यावेत, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पनाताई वरपे, नगरसेविका रुपालीताई पवार, खडकवासला भाजपा अध्यक्ष गणेशजी वरपे, मा. उपसरपंच दिपक दगडे पाटील, सचिन दगडे पाटील, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, राजेशजी कुलकर्णी तसेच समस्त बावधनकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला.
नागरिकांच्या हक्कासाठी आणि बावधनला प्रदूषणमुक्त करण्यासाठी हा लढा पुढेही सुरूच राहणार असल्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी स्पष्ट केले.




