कोथरूड पोलीस ठाण्यात वेळोवेळी दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यानेच माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार
अनुसूचित जातीच्या महिलेची पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडे तक्रार.

पुणे शहर प्रतिनिधी -कोथरूड गावठाण येथील शिवजयंती उत्सव सोहळ्यामध्ये नाचून झाल्यानंतर बाजूला उभे राहून शिवजयंती सोहळा बघत असताना कोणतेही कारण नसताना निलेश राजू धीरे नामक युवकास फायटरने मागून येऊन डोक्यावर वार केला तसेच तो युवक खाली पडल्यानंतर त्याला दुसरा वार करत असताना त्याने प्रतिबंध केला असता त्याच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली व फ्रॅक्चर झाले. व त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार होण्याआधीच तेथे बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. संबंधितांवर दिनांक 20-2-2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु भारतीय न्याय संहिता कलम 109 प्रमाणे कलम वाढ करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडे राधा राजू धीरे यांनी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. राधा राजू धीरे व त्यांच्या कुटुंबीयांवर वेळोवेळी होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत त्यांनी कोथरूड पोलिस स्टेशनला तक्रार देऊनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्यामुळेच मुलावर हा जीवघेणा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त करून वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून भविष्यात होणाऱ्या अन्यायापासून वाचवावे असे तक्रारीत नमूद केले आहे.
कोथरूड पोलीस स्टेशन येथे आलेल्या तक्रारींवर जाणून-बुजन दुर्लक्ष करीत असल्याचे फक्त हेच प्रकरण नसून अशी बरीचशी प्रकरणे आहेत परंतु पोलीस सुद्धा समोरील व्यक्ती कशी आहे,त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तो कोणत्या जातीचा आहे हे पाहूनच तक्रार घेतात किंवा गुन्हा नोंदवून घेतात अशी तेथील नागरीकांमध्ये चर्चा आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने भविष्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारींवर लक्ष घालतील का? हा गहन प्रश्न आहे.



