टॉप न्यूज़

नदीपात्र वाचवण्यासाठी रिपाई (सचिन खरात गट )पक्षाच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात जनहितार्थ पत्रकार परिषद

पुणे प्रतिनिधी -प्रभाग क्रमांक 8 बोपोडी येथील मुळा नदी पत्रामधील राडा -रोडा पुणे मनपाने ताबडतोब काढावा अन्यथा जनआंदोलन उभारू….
फिरोज मुल्ला (सर )मुख्य संघटक महा.राज्य
बोपोडी येथील मुळा नदी पात्रात प्रचंड मुठ्या प्रमाणात राडा -रोडा पडला आहे व गाळ प्रचंड प्रमाणात साचला आहे येणाऱ्या पावसाळात थोडया प्रमाणात जरी पाऊस आला तरी नदी पात्र तुडुंब भरून वाहत आहे आणि त्यात पुलाचे काम झाले आहे त्याचापण रडारोडा तिथेच पडला आहे तसेच बोपोडी येथील रेल्वेच्या पुलाचे काम सुरु आहे त्या ठेकेदाराने तर चक्क नदी पात्रामध्ये बाहेरून रडारोडा आणून नदी पात्रामध्ये टाकून पाणी आडवून तेथे रस्ताच तयार केला आहे आणि ते काम सुरु करण्यासाठी ठेकेदाऱ्यानी कुठल्याच प्रकारचे परवाने घेतले नाही आणि राजरोजपणे काम सुरु आहे या कामाचे व्हिडीओ फोटो आम्ही सोशल मीडियावर टाकले आहेत व पुणे मनपा आयुक्त,कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग पुणे, कार्यकारी अभियंता मल:निसारण देखभाल दुरुस्ती विभाग पुणे मनपा, मुख्य अभियंता प्रकल्प विभाग पुणे मनपा, साह्यक आयुक्त औंध क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदन दिले असून प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची त्यावर कारवाई झालेली दिसत नाही यावरून असे लक्षात येते की प्रशासन नदी वाचवण्यासाठी किती उत्साही आहे याचे हे मोठे उदाहरण दिसून येते रडारोडा टाकल्यामुळे नदीचे पाणी वाहत नाही त्यामुळे पुराचे पाणी आल्यावर जवळपासच्या 25ते 30 सोसायटी व वास्त्यांमध्ये व बोपोडी गावठाण परिसरामध्ये प्रचंड मुठ्या प्रमाणात पाणी शिरण्याचा धोका आहे त्यामुळे मुठ्या प्रमाणात जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. रिव्हर फ्रंट योजने अंतर्गत अनावश्यक नदी पात्रत रस्ता तयार होत आहे ही बाब फार गंभीर आहे प्रशासन यावर उदासीन आहे यांचा मुख्य हेतू नागरिकांच्या सोयीसाठी नसून ग्रीन बेल्ट व ब्ल्यू लाईनच्या योजनेखाली नदीपात्रालगत रडारोडा टाकून जमीन निर्माण करणे व ती हडपने असा प्रकार चालू आहे की काय? प्रशासनाच्या कारभारावरून हेच दिसून येत आहे याचा फटका पर्यावरण व नागरिकांना बसणार आहे.
नागरी विकासासाठी पूल, रस्ते आवश्यक आहेत त्यात दुमत नाही परंतु या कामासाठी नैसर्गिक नदी पात्रात रडारोडा टाकून अरुंद करणे व तिला प्रदूषित करणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा प्रकार आहे तरी सदर बाबतीत गांभीर्य पूर्वक प्रशासनाने विचार करावा व मुळा नदी पात्रामधील गाळ काढण्यात यावा व रडारोडा काढण्यात यावा तसेच चंद्रमणीसंघ वस्तीपासून पशु पक्षी विहार उद्यान व बोपोडी ब्रिजपर्यत संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधवी व सुशुभीकरणाच्या नावाखाली सिमेंटचे ब्लॉक टाकल्यामुळे वाहत्या पाण्याचा प्रवाह थांबत आहे त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे पुणे मनपाकडे संरक्षण भिंत बांधण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तो वापरण्यात आला नाही तसेच आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या इंजिनिअर व ठेकेदारावर प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई केल्याचे निदर्शनास आले नाही
तरी प्रशासनाने रडरोड्याने भरलेली नदी पात्र तातडीने येणाऱ्या पावसाळ्याच्या आत उपाययोजना करून नदीपात्र मोकळे करावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने पर्यावरण व नदी वाचवण्यासाठी जनहितार्थ जनआंदोलन करावे लागेल व प्रशासनाच्या विरोधात हरीत लावादाकडे कोर्टात याचिका दाखल करावी लागेल आणि साह्यची मोहीम राबूवून मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देणार आहोत असे पत्रकार परिषदे मध्ये फिरोज मुल्ला सर यांनी सांगतले
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, पर्यावरणवादी जेष्ठ नागरिक शामकांत पाटील, पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल घोडके,छ. शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!