नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका येथे आंदोलन सुरू
शिक्षणाचा स्तर कमी होत असल्याच्या कारणाने व दहावी , बारावीच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झाल्याच्या निषेधार्थ

पुणे शहर प्रतिनिधी: पुणे येरवडा येथील नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास झाले त्यामध्ये दहावी मधील 68 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व बाकीचे 34 विद्यार्थी नापास झाले ,बारावी कॉमर्स विषयांमध्ये 155 विद्यार्थ्यांपैकी अवघे 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले बाकीचे 95 विद्यार्थी नापास झाले, याचे प्रमुख कारण शाळेला पुरेसे शिक्षक नाहीत तथा शिक्षकांचा अभाव आहे .या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील माजी विद्यार्थी नाराज झाले तसेच आपण शिक्षण घेतलेल्या शाळेचे नुकसान होत आहे,बदनामी होत आहे, कालांतराने आपली शाळा पटसंख्या कमी झाल्यामुळे बंद होईल या भीतीमुळे अनेक प्रश्न समोर ठाकल्यामुळे मनामध्ये प्रश्न निर्माण होत असल्याच्या कारणामुळे पुढील संभाव्य चर्चा करण्यासाठी संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून सुद्धा पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त शिक्षण विभाग सौ वसुंधरा बारवे तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक आशा उबाळे चर्चेसाठी उपलब्ध होत नाही म्हणून व उपायुक्त शिक्षण विभाग यांच्याकडून कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 15 जून 2026 पासून चालू झाले आहे.
या बेमुदत धरणे आंदोलनाचे प्रमुख समन्वयक नेताजी सुभाषचंद्र बोस माजी विद्यार्थी असून त्यामध्ये प्रामुख्याने अरुणभाऊ वाघमारे,इजाज खान,विशाल मस्के,शैलेंद्र राजगुरू, सोमनाथ नारायण कंक,सलमाताई शेख, नंदकुमार सातपुते ,संजय परदेशी, सुनील भोपळे ,सुधीर वांबोरे, वसंत बराटे ,चंद्रकांत लोढा, सुहास राजगुरू, प्रफुल्ल चव्हाण , सिद्धार्थ रणधीर आधी उपस्थित होते

आंदोलनातील प्रमुख प्रश्न व मागण्या
1. शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये विद्यार्थ्यांचे प्रगतीचे नियमित मूल्यमापन करण्यात आले होते का? त्या संदर्भात कोणती उपाययोजना करण्यात आली
2. चाचणी परीक्षा सराव परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनामध्ये शैक्षणिक वर्ष 2025 2026 मध्ये कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन अतिरिक्त तास व सुधारणा योजना त्या संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात यावी
3. विद्यार्थ्यांच्या कमकुवत विषयांची ओळख करून त्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता का?
4. पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत वेळोवेळी माहिती देण्यात आली होती का?
5. शिक्षकांची नियमित उपस्थिती अध्यापनाची गुणवत्ता आणि अभ्यासक्रम पूर्णत्वाबाबत प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले होते का?
6. महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळांना आवश्यक शिक्षण शैक्षणिक साधने व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या का?
7. अंतर्गत परीक्षांमधील निकाल पाहता मोठ्या प्रमाणात अपयशाची शक्यता दिसून येत असताना त्यावर कोणत्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या?
8. शाळा प्रशासन व शिक्षण विभाग यांच्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी झालेल्या पुत्र व्यवहाराची व उपाययोजनांची लेखी नोंद उपलब्ध आहे का?
9. पुणे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून दहावी व बारावीचे परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते त्यापैकी किती विद्यार्थी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झाले याची सविस्तर मूल्यांकन व तुलनात्मक विश्लेषण सार्वजनिक केले जाणार का?
10. नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालयातील निकाल हा केवळ एका शाळेपुरता मर्यादित विषय आहे की पुणे महानगरपालिकेच्या इतर शाळांमध्ये अशा प्रकारची स्थिती आहे याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार का? जर अनेक शाळांमध्ये निकाल घसरले असतील तर पुणे महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्तेचा प्रश्न गांभीर्याने तपासून सुधारणा आराखडा तयार करणार का?
विद्यार्थ्यांचे भविष्य, भवितव्य, पालकांचा विश्वास आणि महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता टिकवण्यासाठी या सर्व प्रश्नांचा वास्तवनिष्ठ पारदर्शक व जबाबदार उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे.



