टॉप न्यूज़

मार्केटयार्ड येथील शारदा गणपती मंडळ येथील बेकायदेशीर पत्र्याचे शेड तात्काळ हटवा : अमर पंडागळे

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी पदाचा गैरवापर केल्याची जोरदार चर्चा

पुणे शहर प्रतिनिधी : पुणे येथील मार्केटयार्ड परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळ (शारदा गणपती) येथे गणेशोत्सव काळामध्ये बेकायदेशीर पत्रा शेड बांधकाम केलेले आहे.सदर बांधकाम पत्रा शेड कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सार्वजनिक जागेत बेकायदेशीरपणे उभारले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले गणेश घुले हे श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून पत्र्याच्या शेडचे बांधकाम केलं असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे

 

या शेडमुळे शेतकरी, ग्राहक व हमाल यांच्या दैनंदिन शेतीमाल वाहतूक, माल उतरवणे-भरणे या कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. शेडमुळे वाहनांची वर्दळ थांबून शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होत आहे, हमाल वर्गाला काम करण्यास जागा उपलब्ध होत नाही. ग्राहक व व्यापाऱ्यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे.सदर कृती ही महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ चे कलम ५२ चे उल्लंघन असून, तात्काळ हा बेकायदेशीर पत्रा शेड हटवण्यात यावा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व चौकशीचा अहवाल मला कळवावा अशी मागणी कामगार न्याय सुरक्षा वृत्तपत्राचे संपादक अमर पंडागळे यांनी खालील नमूद ठिकाणी निवेदनाद्वारे केली आहे.

1) कार्यकारी संचालक/सरव्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,बाजार समिती,पुणे

2) सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती,पुणे 

3) हमाल पंचायत / माथाडी बोर्ड ऑफिस, मार्केट यार्ड, पुणे 

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!