कनिष्ठ अभियंता सौरभ खरात यांच्या स्थावर व जंगम मालमतांची चौकशीची क्रांती मजदूर सेनेची मागणी
कनिष्ठ अभियंता सौरभ खरात यांनी त्यांच्या कार्यकाळात लोहगाव हद्दीमध्ये अनधिकृत बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या नोटिसांची व त्यावरील कारवाईची चौकशीची मागणी.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एक अंतर्गत जागा मालक यांच्याकडून लोहगाव हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवानगी अनधिकृत बहुमजली आरसीसी इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यामुळे पुणे मनपाचा लाखो रुपयांचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जात आहे. तसेच पुणे महानगरपालिका किंवा बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक १ ची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता संपूर्ण लोहगाव हद्दीमध्ये सर्रासपणे, राजरोसपणे बांधकामे चालू आहेत.पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक एकचे कनिष्ठ अभियंता सौरभ खरात अनधिकृत बांधकामांना नोटीस देतात व कारवाई करण्यासाठी जातात त्यावेळेस फक्त होल मारून येतात व थातूरमातूर कारवाई दाखवतात.


त्यामुळे सदर ठिकाणी पुन्हा जैसे थी परिस्थिती असते आणि अनधिकृत बांधकाम पूर्ण केले जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा वेळ, मनुष्यबळ, पोलिसांचा फौज फाटा पुणे महानगरपालिकेच्या गाड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका तोट्यात जात आहे.असा आरोप क्रांती मजदूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन ओहोळ यांनी केलेला असून त्यामुळे विविध खालील मागण्यासाठी क्रांती मजदूर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सोमवार दिनांक ०२. फेब्रुवारी २०२६ पासून करण्यात येणार आहे.
१.बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक १ चे कनिष्ठ अभियंता सौरभ खरात यांनी लोहगाव हद्दीचा चार्ज घेतल्यापासून काढलेल्या नोटीस व त्यावर केली गेलेली कारवाई याची चौकशी करण्यात यावी .
२.कनिष्ठ अभियंता सौरभ खरात यांनी जमविलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांची चौकशी करण्यात यावी.


