शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
वसुली बहाद्दर पानसरे व पाटील यांची नावे चर्चेत

पुणे जिल्हा प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर अवैद्य धंदे सर्रासपणे चालू आहेत. शिक्रापूर व आसपासच्या परिसरामध्ये मजूर वर्ग कामगार वर्ग यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात लालसेपोटी तेथे मटका पत्ती सोरेट याच्या माध्यमातून कमी श्रमात जास्त पैसे मिळतील या आशेतून अनेक मजूर पैसे घालून भिकेला लागत आहेत. कोरेगाव भीमा येथील आनंद एजन्सीच्या मागे भरत गव्हाणे नामक व्यक्ती मटक्याचा धंदा चालवत असून आत्तापर्यंत बऱ्याचदा कारवाई करून देखील तेथे धंदा तात्पुरता बंद करून पुन्हा चालू करण्यात येतो


तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याचशा पान टपऱ्यांमधून, दुकानांमधून अवैधपणे गुटखा विक्री केले जात आहे. राम माळी नामक व्यक्ती त्याच्या दुचाकी(MH 12,WN 1450,) मधून शिक्रापूर व आजूबाजूच्या परिसरामध्ये गुटक्याचे वितरण करीत आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर पूर्णपणे बंदी घातलेले असून सुद्धा हा गुटखा विक्रीसाठी शिक्रापूर व परिसरात येतोच कसा?


तसेच चाकण शिक्रापूर रस्त्यावर भारत गॅस एजन्सी फाट्यापासून 200 ते 300 मीटर अंतरावर हॉटेल न्यू खालसा पंजाब आनंदपुर साहेब नावाने हॉटेल असून 24 तास अवैधपणे मद्य विक्री तसेच चकना सेंटर म्हणून चालविले जात आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन यांचे कोणतेही भय यांना दिसून येत नाही त्यामुळे हे वारंवार गुन्हे करीत आहेत.


याचे कारण की शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी पानसरे व पाटील नामक दोन वसुली बहाद्दर नेमले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिक्रापूर व परिसरातील अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक नागरिक लवकरच पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची भेट घेणार आहेत




