लोकल न्यूज़

मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप निलंबित

लुटीची घटना घडूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी बॅग हरवल्याची तक्रार नोंदवल्याचे समोर

पुणे : मार्केट यार्ड परिसरात भरदिवसा ३० लाख रुपयांची लूट झाल्यानंतरही पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी बॅग हरवल्याची तक्रार नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल २१ दिवस लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अखेर स्वारगेट पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी ३० लाखांच्या लुटीची कबुली दिली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड पोलिसांना लुटीचा गुन्हा दाखल करावा लागला. या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना तत्काळ निलंबित केले आहे.
ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडली. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील श्रवण शंकरलालजी देवासी (२२) हे मार्केट यार्डमधील एस.पी. एंटरप्रायझेस येथे काम करतात. कंपनीचे मालक राकेश परिहारिया (३२) यांनी श्रवण आणि त्यांचा सहकारी गणपत हेमाराम देवासी (१८) यांना घरातून ३० लाख रुपये रोख आणण्यास सांगितले होते.दोघेही कर्मचारी ३० लाख रुपयांची रोकड बॅगेत घेऊन ॲक्टिव्हावरून जात होते. मार्केट यार्डमधील शिवनेरी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्रजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा रस्ता अडवला. ॲक्टिव्हा थांबताच मागे बसलेल्या आरोपीने श्रवण आणि गणपत यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला तीव्र जळजळ होऊ लागली. दोघेही तोल जाऊन खाली पडले.त्याचवेळी आणखी एका दुचाकीवरून तीन आरोपी घटनास्थळी पोहोचले. पाचही आरोपींनी ३० लाख रुपयांची बॅग हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर श्रवण यांनी कंपनीचे मालक राकेश परिहारिया यांना फोन करून माहिती दिली. परिहारिया तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, लुटीची घटना घडूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी बॅग हरवल्याची तक्रार नोंदवल्याचे समोर आले.

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!