महाराष्ट्र

रवींद्र नाट्यमंदिर येथे प्रा. देविदास पंडागळे यांना सावित्री-फातिमा २०२६ पुरस्कार प्रदान

पुरस्कार माजी शिक्षक आमदार मा. कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान

मुंबई : प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित शिक्षक स्नेह संमेलन २०२६ कार्यक्रम उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रा. देविदास पंडागळे यांना सावित्री-फातिमा २०२६ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार माजी शिक्षक आमदार मा. कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन शिक्षक भारती तर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे व कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले होते. कार्यक्रमास बृहन्मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृह शिक्षक-शिक्षकेतर बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने गजबजून गेले होते.
तसेच बृहन्मुंबई शिक्षकेतर संघटनेचे सचिव सुनिल खाडे, उपाध्यक्षा प्रिया पवार, पश्चिम विभाग सचिव माधुरी गावडे, उत्तर विभाग सहसचिव पूर्वा मर्चंडे, दक्षिण विभाग अध्यक्ष भारत काकड आदी शिक्षकेतर पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. देविदास पंडागळे यांनी हा सन्मान सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधव, पदाधिकारी व सहकाऱ्यांना अर्पण केला.
या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!