टॉप न्यूज़

“संविधानाला बळ देण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.”

महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था पुणे संस्थेच्या माध्यमातून आयोजित व्याख्यान अंजली धानोरकर जिल्हाधिकारी-संभाजीनगर यांचे “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : भारतीय संविधान आणि सध्याची स्थिती. "

पुणे शहर प्रतिनिधी:-महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार आणि विचार प्रसारक संस्था पुणे संस्थेच्या माध्यमातून माननीय अंजली धानोरकर जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या व्याख्यानाने आयोजन केले होते त्यांच्या व्याख्यानाचा विषय “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : भारतीय संविधान आणि सध्याची स्थिती. ”
जागरूक मतदार म्हणून वावरलेले पाहिजे नसेल तर वाईट लोकांमध्येच त्यांची गणना होईल या विषयावर बोलत असताना त्यावेळी त्यांनी संविधानाला बळ देण्यासाठी
आपण कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन माननीय अंजली धानोरकर मॅडम अप्पर जिल्हाधिकारी संभाजीनगर यांनी केले सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय एस एम डावरे हॆ होते
त्यावेळी विचारपीठावर उपाध्यक्ष आयु चंद्रकांत काळे , उपाधाक्ष आयु तुकाराम डावरे, जनरल सेक्रेटरी आयु प्रा आर आर सोनकांबळे, आणि ग्रंथापुरस्कार प्रमुख आयु सवाखंडे आदी होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आयु एसएम डावरे यांनी केले पुढे धानोरकर मॅडमनी आपल्या भाषणात म्हणाले की लंडन येथील गोलमेज परिषदेत 1931 साली अस्पृश्नाचे प्रतिनिधी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्यावेळी काँग्रेसने या परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता. तेथे काय बोलायचे हॆ सर्व मुद्दे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माहित होते तिथे केवळ बैठक किंवा चर्चा होणार नव्हती तर तेथे भारताचे भविष्य कसे असले पाहिजे भविष्यातला भारत येथे आकारास येण्याची शक्यता आहे म्हणून आपण तेथे गेले पाहिजे हॆ ज्यांना वाटत होते अनेक नेते तेथे गेले होते.
ब्रिटिशशी चर्चा करीत असताना एका सामान पातळीवर होत होती. बाकीचे नेते इमोशनल च्या आधारावर मुद्दे मांडत होते. मात्र बाबासाहेब एकमेव नेते होते ते वस्तुस्थिती च्या आधारावर तथ्यांच्या आधारावर मुद्दे मांडत होते.
भारतातील जाती व्यवस्था कशी आहे आणि या जातीव्यवस्थेचा परिणाम समाज कारणावर, अर्थव्यवस्थेवर कसा होत आहे आणी सामाजिक प्रतिष्ट्येवर कसा होत आहेत हॆ
सविस्त्तर मुद्दे मांडत होते. आणी सगळे प्रॉब्लेम सांगत असताना इतकेच नाही देश विदेशातील उदाहरणं देऊन त्या देशांनी
समस्या वर उपाय कसे काढले आहेत आणी आपल्या देशांनी काय उपाय योजले पाहिजे हॆ सुद्धा ते सांगत होते थोडक्यात सांगत होते.इतर अनेक नेत्यांनी विचार मांडले पण त्या नेत्यामध्ये बाबासाहेब उठून दिसले असे आपल्या भाषणात म्हणाल्या.
ते केवळ एका समाजाचे नव्हते, तर तेथे भारताचे भविष्य कसे असणार आहे एका राष्ट्राचे नव्हते,भारताला तारणारे नव्हे तर जगाला तारणारे ग्लोबल लीडर होते. असे एकही क्षेत्र नाही की बाबासाहेबांचा परीसस्पर्श लाभलेला नाही. म्हणून आपणच पुढाकार घेतला पाहिजे की बाबासाहेब एका समाजासाठी नाहीत तर सर्व समाजासाठी काय काय केले आहेत ते . आपणच सांगितले पाहिजे. संविधान हे सर्वांसाठी मदत करणारे आहे असे आपल्या भाषणात सांगितले.
डॉ.बाबासाहेब लिहत असतानाचे एक पोस्टर आहे त्यावर लिहिले होते I am because we are म्हणजे आपल्या प्रत्येकाचं अस्तित्व नगण्य आहे जर समाज नसेल तर? म्हणजे I am because we are तुम्ही सगळे जण आहात म्हणून माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. बाबासाहेब होते म्हणून आपण
एक भारतीय नागरिक म्हणून एक स्वतंत्र पणाने स्वतंत्र अधिकाराने स्वतंत्र विचार करत जगू शकत आहोत असे विचार मान धानोरकर मॅडम यांनी मांडले. श्रोता गण मंत्रमुग्ध होऊन भाषण ऐकत होता.
डॉ बाबासाहेबांचे ऋण खऱ्या अर्थाने मान्य करावयाचे असतील आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याला थोडस पुरे पडायचे असेल तर आपण त्यांचे विचार बाकीच्या लोकांकडे पोहचविणे गरजेचे आहे असे विचार आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये व्यक्त केले.


यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक जिल्हाधिकारी सुनिता गायकवाड मॅडम यांचा सत्कार मान धानोरकर मॅडम आणि एस एम डावरे हस्ते करण्यात आला.
सूत्र संचालन संस्थेचे जन. सेक्रेटरी आयु. प्रा आर आर सोनकांबळे यांनी केले, माननीय धानोरकर मॅडम व परिचय आयु. तुकाराम डावरे यांनी केले.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष मान. ऍड एलटी सावंत साहेब,कोषध्यक्ष आयु महेंद्र शिंदे, सचिव अँड आयु होवोल प्रकाश,आयु. जी आर कांबळे, आयु. ननावरे आदी उपस्थित होते.

आभार प्रदर्शन आयु अंकुश सवाखंडे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!