असंघटित कामगारांनी सजग होऊन संघटित व्हावे : प्रा. देविदास पंडागळे

मुंबई प्रतिनिधी-कामगार सहाय्यता संघ, मुंबई यांची अधिकृत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उद्घाटनाच्या निमित्ताने असंघटित कामगारांसाठी विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास लेबर हेल्पलाईनचे संस्थापक श्री. कृष्णाजी अवतार यांची उपस्थिती लाभली. तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस श्री. सुर्यकांत इंगळे हे अतिथी म्हणून उपस्थित होते. बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेचे सरचिटणीस सुनीलजी खाडे हेही अतिथी म्हणून उपस्थित होते.
श्रमिकराज जनआंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक देविदास पंडागळे हे प्रमुख अतिथी व प्रमुख व्याख्याते म्हणून कार्यक्रमास लाभले.

प्रा. देविदास पंडागळे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत संघटनात्मक बळकटीचे महत्त्व स्पष्ट केले. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा योजना, कामगार कायदे आणि हक्कांसाठी संघटित होण्याची गरज यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. “कामगारांनी संघटित होऊन सजग राहणे हीच काळाची गरज आहे” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास बांधकाम मजूर, हमाल, महिला कामगार तसेच विविध असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभ व संमेलन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे आयोजन कामगार सहायता संघ केंद्राचे अध्यक्ष दीपक पराडकर व त्यांच्या सहकार्यांनी केले होते. नव्याने सुरू झालेल्या या कामगार सहाय्यता संघ मूळे असंघटित कामगारांना कायदेशीर मार्गदर्शन व सहाय्य मिळणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.




