पेरणे फाटा येथे अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान व्हिडिओ काढत असल्याचा राग धरून जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
पेरणे फाटा येथील महालक्ष्मी डेव्हलपर्सचे सोहम शिवले, अभिजीत गोते, संदेश गोते आणि इतर दोन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे जिल्हा प्रतिनिधी: पेरणे फाटा येथे महालक्ष्मी डेव्हलपर्स कडून प्लॉटिंग साठीचा मोठा प्रोजेक्ट चालू आहे परंतु हा प्रोजेक्ट अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पी एम आर डी ए च्या माध्यमातून सदर अतिक्रमण विरोधी कारवाई चालू असताना साहिल रामदास भालेराव राहणार आपटी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे तेथे त्यांच्या मित्रांसोबत सदर प्रकाराचे सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करीत होते त्यादरम्यान महालक्ष्मी डेव्हलपर्सचे सोहम शिवले अभिजीत गोते संदेश गोते यांनी तू व्हिडिओ शूटिंग का करत आहेस तुला याचा कोणी अधिकार दिला? असे म्हणून सोहम भालेराव कडे असलेल्या टीव्हीएस ज्युपिटर गाडी वरील निळे वादळ असे लिहिलेल्या स्टिकर वरून हे सोहम शिवले म्हणाला की महारा-मांगाना एवढीच कामे आहेत आणि संदेश गोते म्हणाला की याशिवाय यांना काही जमत नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ तथा अपमानास्पद वक्तव्य केले त्यादरम्यान साहिल भालेराव यांचे आई दीपिका भालेराव तेथे आले असताना त्या ठिकाणी शितल गायकवाड नामक महिलेने साहिल आणि त्याची आई दीपिका भालेराव यांचे अंगावर येऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे लोणीकंद पोलीस स्टेशन येथे बी एन एस 2023 नुसार 351 (2) ,351 (3) ,131 आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 नुसार 3(5),3(1)r,3(1)s गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे




