जिल्हा उपनिबंधक श्री प्रकाश जगताप (पुणे ग्रामीण) कृषी उत्पन्न बाजार समितीतील 4 भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा रिपब्लिकन आझाद सेनेचा आरोप

पुणे शहर प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्हा येथील भ्रष्टाचाराची 4 वेळा लेखी तक्रार देऊन सुद्धा पुणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था श्री प्रकाश जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीतील घनशाम जेधे ( कथित बोगस पद नियुक्ती )अलंकार खेडेकर ( शांतता समितीवरील बेकायदेशीर वावर )सोमनाथ बोरकर (बेनामी सावकारीचा आरोप) आणि नितीन चौरे ( सरकारी कामात कसूर ) या 4 अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन आजाद सेनेतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे या 4 अधिकाऱ्यांबरोबर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चे प्रकाश जगताप यांची सुद्धा मिलीभगत आहे असा संशय व्यक्त करून त्यांच्यावर सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन आझाद सेनेच्या वतीने 2 नोव्हेंबर 2026 रोजी पर्यंत पणन संचानालय सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले असून त्याचे निवेदन पणन संचालक याना देण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष अजय शिंदे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता कांबळे उपाध्यक्ष संदीप चव्हाण आकाश शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





