लोकल न्यूज़

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाची धडक कारवाई …

शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोडसह हडपसर-मांजरी परिसरात कारवाई,२४ हजार ५०० चौरस फूट अनधिकृत बांधकामे हटवली!

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) धडक कारवाई केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमणाथ बनकर यांच्या नियंत्रणाखाली शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंत्रा सोसायटी आणि केशवनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत तब्बल २४ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत कच्चे व पक्के बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे स्टॉल, हातगाड्या, पथाऱ्या आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले.

हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २६ काऊंटर, ७ लोखंडी टेबल, १ स्टील टेबल, ४ फ्रिज, ३ सिलिंडर, ६ लोखंडी स्टँड, ४ टेंट, ३३ टेबल व खुर्च्या, १ शेगडी तसेच अन्य १० ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईसाठी सहाय्यक उपआयुक्त कैलास वाळेकर, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, सागर विभुते यांच्यासह विविध क्षेत्रीय कार्यालयांतील अतिक्रमण निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.कारवाईदरम्यान पुणे महानगरपालिका पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, एमएसएफ जवान, जीआरपी, गॅस कटर व बेकर पथक तसेच बिगारी सेवकांची मदत घेण्यात आली.

शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात यापुढेही वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!