मार्केटयार्ड मध्ये 7 लाखांचा एम डी साठा जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सराईत सचिन वाल्हेकर,अजय उर्फ गोट्या मुळे आणि मोहम्मद खान फरार

पुणे शहर प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि १४.११.२०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता वारणा सहकारी बँक लिमिटेड पुणे येथील बिल्डिंग जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे २४.६३ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम. डी.) अमलीपदार्थ पकडण्यात आले आहे .ज्याची अंदाजे किंमत 7,05,426/ असून रु 1,50,000/- किमतीचे 3 मोबाईल फोन, एक ऑटो रिक्षा व रोख रु 2829 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .अमली पदार्थ विरोधी पथक 02 गुन्हे शाखा चे अफरोज पठाण यांनी तक्रार दाखल केली असून योगेश नामदेव मांढरे यांनी फिर्याद दिलेली आहे.
त्यानुसार एन डी पी एस ऍक्ट कलम ८( क ) 21 ( ब) व 29 प्रमाणे गुन्हा क्रमांक २३०/२०२६ मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे या कारवाईत सुभाषगौडा गुरण्णा चौधरी वय -३२ वर्षे, बाप्पू भीमा बाळशंकर वय- 28 वर्षे, शाहरुख मेहबूब खान वय- 28 वर्षे सर्व रा आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे-४११०३७ या आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून इतर सराईत सचिन वाल्हेकर, अजय उर्फ गोट्या मुळे आणि मोहम्मद खान हे फरार झालेले असून त्यांचा शोध चालू आहे.



