महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतना साठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे दिव्यांग आयुक्तालय , पुणे यांचेसमोर आमरण उपोषण

सोलापूर जिल्ह्यातील ९ व लातूर जिल्ह्यातील ३ अशा १२ मतिमंद व मूकबधिर शाळेतील कर्मचाऱ्यांचा समावेश

सोलापूर जिल्ह्यातील ९ व लातूर जिल्ह्यातील ३ अशा १२ मतिमंद व मूकबधिर शाळेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन इतर मागण्यासाठी पुणे येथील आयक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांचे कार्यालयासमोर प्रोटान शिक्षक संघटना, सोलापूरच्या वतीने आमरण उपोषणाला सुरु करण्यात आले आहे.
यामध्ये जगदंबा मूकबधिर शाळा करमाळ्यातील चक्रधर पाटील, सुलभा एकलारे, लवंगी तालुका मंगळवेढा मुक्ताई मतिमंद बालगृहातील सारंगा पावरा ,विशाल शेंद्रे, सागर शेंद्रे, सोलापूरच्या मधुसूदन मूकबधिर निवासी शाळेतील तेजकुमार माने, संतोष बालशंकर, रुक्मिणी होटकर, मंगलदास मूकबधिर निवासी शाळा सोलापूरचे कर्मचारी प्रतिनिधी स्वाती मंडलिक यांच्या सह लातूर जिल्ह्यातील बबन भंडारे, शिरीष जाधव, अर्चना पाटील या लातूर जिल्ह्यातील राजीव गांधी मतिमंद शाळा कर्मचाऱ्याचा सहभाग आहे. यासाठी प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल कोळी, महासचिव संतोष कांबळे, सल्लागार सक्कर मोरे यांनी दिव्यांग आयुक्तालय पुणे व वरिष्ठांना यासाठी थकीत वेतन व इतर मागण्या साठी वारंवार लेखी निवेदन दिले आहे. तसेच उपोषणही केले आहे मात्र आश्वासन देऊनही त्यांनी मागणीची पूर्तता केली नसल्याने नऊ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या विविध सोलापूर व लातूर जिल्ह्यातील शाळेतील कलाशिक्षक, विशेष शिक्षक, राखणदार, लिपिक मोलकरीण ,सफाई कामगार, काळजीवाहक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने संविधानिक लोकशाही मार्गाने हे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनामध्ये बंद शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन, सभासदांचे थकीत वेतन,विनावेतनचे वेतन काढणे आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
चौकट
थकित कर्मचारी कर्मचाऱ्यांचे वेतनाचे काम अर्थपूर्ण व्यवहार करून केल्याचा संशय आहे अनेकांचे कामे आदेश एक वेगळ्या हेतूने प्रलंबित ठेवण्यात आल्याचा संशय येत आहे शासनाकडे अधिक वेळा मागणी करून हे कामे रखडवण्याचा उद्देश काय मूकबधिर मतिमंद आदी दिव्यांग प्रकारातील बालकांच्या बरोबरच त्यांच्यासाठी कार्यक्षम कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य जाणीवपूर्वक अंधारात ठेवले जात असल्याचे दिसत आहे.

पुणे येथील दिव्यांग कार्यालय समोर थकीत वेतन व इतर कामासाठी आमरण उपोषण करत असलेले डझनभर कर्मचारी. यावेळी चक्रधर पाटील, सुलभा एकलारे, सारगा पावरा , विशाल शेंद्रे, सागर शेंद्रे, तेजकुमार माने, संतोष बालशंकर रुक्मिणी होटकर, स्वाती मंडलिक , बबन भंडारे शिरीष जाधव अर्चना पाटील आदि

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!