कोथरूड येथील पि.के.दम बिर्याणी हाऊसमध्ये काम करीत आहेत बालकामगार…
पोलखोल करणारे संपादक अमर पंडागळे यांना अरेरावी व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

पुणे शहर: कोथरूड येथील पि.के. दम बिर्याणी हाऊस हे बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे म्हणून साप्ताहिक कामगार न्याय सुरक्षाचे संपादक अमर पंडागळे व उपसंपादक दिलीप बनसोडे रात्रीचे जेवण करण्यासाठी दिनांक 17.05.2026 रोजी गेले असताना तेथे दोन-तीन बालकामगार काम करीत असल्याचे निदर्शनास आले. बालकामगारांकडून श्रम करून घेने व त्यांची पिळवणूक करणे हा बालकामगार प्रतिबंधक कायदा 1986 नुसार गुन्हा आहे. त्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी तेथील मॅनेजर यांना बालकामगारांचे आधार कार्ड किंवा वयाचा पुरावा दर्शविण्यास सांगितले असता तेथे पी.के.दम बिर्याणी हाऊसचे मालक पाटील आले आणि त्यांनी सदर मुले ही विद्यार्थी असून बालकामगार आहे असे कबूल केले आणि त्यांना आजच त्यांच्या गावी पुन्हा पाठवतो असे सांगितले. परंतु मॅनेजरने त्यांच्या हजेरी बुक चा उल्लेख करून हजेरी बुक तुम्हाला दाखवतो असे म्हणताच तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आम्ही विद्यार्थ्यांना रोजगार दिलेला असून माझी अशी 10 ते 15 हॉटेल्स विविध भागांमध्ये चालू असून आत्तापर्यंत आमचे वर बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही तुम्हाला त्यात काय अडचण आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्याबरोबर त्या सर्व बालकामगारांना घेऊन जा असे म्हणून अरेरवीची भाषा करून शिवीगाळ केली व तुम्ही इथून निघून जा नाहीतर तुम्हाला मारू अशी धमकी दिली.

(वरील फोटोतील व्यक्ती पी.के.दम बिर्याणी हाऊसचे मालक पाटील)
सदर प्रकरणी पि.के.दम बिर्याणी हाऊसचे मालक पाटील यांचे विरुद्ध भारतीय न्याय सहिता कलम 131,352,351(2) प्रमाणे कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून

बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 नुसार पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.




