लोकल न्यूज़
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी किशोर मारणे

पुणे शहर प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे कोथरूड येथील काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते तथा पुणे शहर सरचिटणीस किशोर मारणे यांची खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक पदी एडवोकेट विक्रांत चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे.
किशोर मारणे हे विद्यार्थी दशेपासून युवक काँग्रेसचे काम करत असून सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. कोथरूड भागातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते सुपरिचित आहेत. किशोर मारणे यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आह



