महाराष्ट्र

ह.भ.प.गणेश महाराज शेडगे (मृदंग अलंकार) यांना “श्री भैरवनाथ सन्मान” गौरव पुरस्कार प्रदान

बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, 28 वा वर्धापन दिन उत्साहात

पुणे शहर प्रतिनिधी: बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बाणेर, यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त, “श्री भैरवनाथ सन्मान” गौरव पुरस्कार, ह.भ.प.श्री. गणेश नामदेव शेडगे (मृदंग अलंकार) यांना, मंगळवार दि. १/९/२०२६ रोजी, कुंदन गार्डन बाणेर येथे, महाराष्ट्र भूषण, मृदंग महर्षी, ह.भ.प.श्री. पांडुरंग आप्पा दातार, (भोर- राजगड- मुळशी) विद्यमान आमदार श्री. शंकर भाऊ मांडेकर, ह.भ.प. आबासाहेब कोळेकर, माजी आमदार श्री. शरदराव ढमाले, संतसेवक ह.भ.प. मारुती दादा कोकाटे, पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब चांदरे यांच्या हस्ते देण्यात आला.

गणेश महाराज शेडगे हे विद्यार्थी दशेपासून संत साहित्य, अध्यात्मिक, प्रवचनकार यांच्या सानिध्यात मृदंग वादन करीत असून मृदंग शिक्षणाचे धडे सुद्धा ते देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी मृदंग वादन कला आत्मसात केलेली आहे.

 

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!